Cash For Query Row: टीएमसी खासदार महुआ मोईत्रावर संसदेत प्रश्न विचारण्यासाठी लाच घेतल्याचा आरोप, अदाणी समुहाकडून आले स्पष्टीकरण

भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्या कडून तृणमूल काँग्रेसच्या खासदार महूआ मोईत्रा यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत.

Mahua Moitra (Photo Credit - Twitter/ANI)

भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्या कडून तृणमूल काँग्रेसच्या खासदार महूआ मोईत्रा यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना यासंदर्भात पत्र लिहिलं आणि महुआ यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी केली. लोकसभेत काही प्रश्न विचारावेत यासाठी उद्योजक दर्शन हिरानंदानी यांच्यात आर्थिक आणि भेटवस्तुंच्या माध्यमातून देवाणघेवाण केल्याचा आरोप त्यांनी केला. या संदर्भात अदानी समुहाकडून देखील टिका करण्यात आली असून काही लोकांकडून गौतम अदानी आणि समुहाची प्रतिष्ठा कमी करण्याचे काम केले जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement