Arnab Goswami Will Apologize! न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल अर्णब गोस्वामी बिनशर्त माफी मागणार, दिल्ली उच्च न्यायालयात स्वतः दिली माहिती
प्रतिवादी क्रमांक 5 च्या वकिलांनी (अर्णब गोस्वामी) सांगितले आहे की ते एक आठवड्याच्या कालावधीत बिनशर्त माफी मागणारे शपथपत्र दाखल करतील.
रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांनी दिल्ली उच्च न्यायालयात सांगितले की, पर्यावरणवादी आणि टेरीचे माजी प्रमुख आरके पचौरी यांनी दाखल केलेल्या न्यायालयाच्या अवमानाच्या प्रकरणात ते बिनशर्त माफी मागतील. दिवंगत पचौरी यांनी 2016 मध्ये गोस्वामी टाइम्स नाऊमध्ये असताना अवमानाचा खटला दाखल केला होता. प्रतिवादी क्रमांक 5 च्या वकिलांनी (अर्णब गोस्वामी) सांगितले आहे की ते एक आठवड्याच्या कालावधीत बिनशर्त माफी मागणारे शपथपत्र दाखल करतील. (हेही वाचा: बिल्किस बानो प्रकरणातील दोषींच्या सुटकेवर Supreme Court ची तीक्ष्ण टिप्पणी; गुजरात सरकारकडे मागितली कारणे)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)