अन्नपूर्णा पर्वत मोहिमेदरम्यान जखमी झालेले गिर्यारोहक Anurag Maloo यांना काठमांडूहून आणले भारतात; Adani Foundation ने केली एअर अॅम्ब्युलन्सची व्यवस्था
राजस्थानमधील किशनगढ येथील अनुराग एप्रिलच्या मध्यात कॅम्प-3 वरून उतरताना 6,000 मीटरवरून खाली पडून बेपत्ता झाले होते. अन्नपूर्णा पर्वत हा जगातील दहाव्या क्रमांकाचा उंच पर्वत आहे.
नेपाळमधील अन्नपूर्णा पर्वताच्या मोहिमेदरम्यान राजस्थानचे गिर्यारोहक अनुराग मालू बेपत्ता झाले होते. शोधानंतर खोल दरीत गंभीर अवस्थेमध्ये ते सापडले. आता अनुराग मालू यांना काठमांडूहून खास विमानाने भारतात आणण्यात आले. अदानी फाऊंडेशनने व्यवस्था केलेल्या एअर अॅम्ब्युलन्समध्ये त्यांना एअरलिफ्ट करण्यात आले. सध्या त्यांच्यावर दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) उपचार सुरू आहेत. अनुराग मालू हे गिर्यारोहक आणि क्लायमेट अॅथलीट आहे. वेळेवर एअरलिफ्टिंगसाठी मदत केल्याबद्दल त्यांनी अदानी फाऊंडेशनचे आभार मानले आहेत.
राजस्थानमधील किशनगढ येथील अनुराग एप्रिलच्या मध्यात कॅम्प-3 वरून उतरताना 6,000 मीटरवरून खाली पडून बेपत्ता झाले होते. अन्नपूर्णा पर्वत हा जगातील दहाव्या क्रमांकाचा उंच पर्वत आहे. (हेही वाचा: तामिळनाडू विल्लुपुरममध्ये विषारी दारुने आणखी 2 जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा 18 वर)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)