Andhra Pradesh Shocker: शाळेत उशिरा येण्याची शिक्षा! मुख्याध्यापकांनी 18 विद्यार्थिनींचे केस कापले, उन्हात उभे केले, विभागाकडून निलंबन

विद्यार्थिनींनी सांगितले की, शुक्रवार, 15 नोव्हेंबर, कार्तिक पौर्णिमा सणाच्या दिवशी पाण्याअभावी त्या उशिरा शाळेत पोहोचल्या. त्यानंतर मुख्याध्यापकांनी त्यांचे केस कापले.

Girl Student | (File Image

आंध्र प्रदेशातील अल्लुरी सीतारामराजू जिल्ह्यातील एका शाळेतून एक धक्कादायक बाब समोर येत आहे. याठिकाणी मुख्याध्यापकांनी मुलींना सकाळच्या प्रार्थना सभेसाठी वेळेवर न आल्याने अशी शिक्षा दिली, ज्यामुळे वाद निर्माण झाला. उशिरा येण्याची शिक्षा म्हणून मुख्याध्यापकांनी 18 मुलींचे केस कापले, तसेच त्यांना उन्हात उभे केले. मदुगुला येथील कस्तुरबा बालिका विद्यालय (केजीबीव्ही) येथे हा भयंकर प्रकार घडला. विद्यार्थिनींनी सांगितले की, शुक्रवार, 15 नोव्हेंबर, कार्तिक पौर्णिमा सणाच्या दिवशी पाण्याअभावी त्या उशिरा शाळेत पोहोचल्या. त्यानंतर मुख्याध्यापकांनी त्यांचे केस कापले. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी आरोपी मुख्याध्यापकाला निलंबित केले आहे. पुढील तपास करण्यात येत आहे. ही घटना समोर आल्यावर शिक्षण विभागाने आरोपी प्राचार्य यू साई प्रसन्नाविरुद्ध तपास केला होता. त्यांच्यावरील आरोप खरे असल्याचे निष्पन्न झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी रात्री उशिरा निलंबनाचे आदेश जारी केले. (हेही वाचा: MBBS Student Dies After Ragging: गुजरातमध्ये वरिष्ठांच्या रॅगिंगमुळे एमबीबीएसच्या विद्यार्थ्याचा मृत्यू; 3 तास उभे राहिल्यानंतर पडला बेशुद्ध)

मुख्याध्यापकांनी 18 विद्यार्थिनींचे केस कापले-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement