Amazon India Head Manish Tiwary Resigns: ॲमेझॉन इंडियाचे कंट्री हेड मनीष तिवारी यांचा राजीनामा; ऑक्टोबरपर्यंत सांभाळणार पद
गेल्या आठ वर्षांत मनीष यांच्या नेतृत्वामुळे ग्राहक आणि विक्रेते यांच्यातील नाते अधिक घट्ट झाले आहे. त्यांनी ॲमेझॉनला भारतीय बाजारपेठेत ओळख मिळवून देण्यासाठी मदत केली.
Amazon India Head Manish Tiwary Resigns: अमेरिकन ई-कॉमर्स कंपनी ॲमेझॉनचा भारतीय व्यवसाय सांभाळणारे मनीष तिवारी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तब्बल 8 वर्षांनंतर मनीष तिवारी यांनी ॲमेझॉन इंडियाचे कंट्री हेड पद सोडले आहे. आता ते दुसऱ्या कंपनीत नवीन जबाबदारी स्वीकारणार आहेत. मात्र ते कोणत्या कंपनीत जाणार आहेत, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. ॲमेझॉनच्या प्रवक्त्याने मनीष यांच्या राजीनाम्याला दुजोरा दिला आहे. गेल्या आठ वर्षांत मनीष यांच्या नेतृत्वामुळे ग्राहक आणि विक्रेते यांच्यातील नाते अधिक घट्ट झाले आहे. त्यांनी ॲमेझॉनला भारतीय बाजारपेठेत ओळख मिळवून देण्यासाठी मदत केली. आता राजीनामा दिल्यानंतर कंपनीच्या नवीन परिवर्तनात मदत करण्यासाठी मनीष तिवारी ऑक्टोबरपर्यंत ॲमेझॉनमध्ये काम करतील. (हेही वाचा; Mukesh Ambani's Reliance Makes History: मुकेश अंबानींच्या रिलायन्सने रचला इतिहास; फॉर्च्यून ग्लोबल लिस्टमध्ये तब्बल 21 वर्षे कंपनीचा दबदबा कायम)
पहा पोस्ट-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)