Air Asia Flight Tyre Cracked: विमानाचा टायर चिरला, डीसीजीएकडून एअर एशियाचे विमान पुणे येथे लँड
विमानाच्या टायरला चीर (Air Asia Flight Tyre Cracked गेल्याचे आढळून आल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे वृत्तसंस्था एएनआयने अधिकाऱ्याच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.
एअर एशिया (Air Asia) कंपनीचे विमान नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) रविवारी (12 फेब्रुवारी) पुणे (Pune) येथे तातडीने उतरवले. विमानाच्या टायरला चीर (Air Asia Flight Tyre Cracked गेल्याचे आढळून आल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे वृत्तसंस्था एएनआयने अधिकाऱ्याच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. कंपनीने म्हटले आहे की, विमानाने बंगळुरु विमानतळावरुन उड्डाण भरले होते. दरम्यान, काही वेळातच विमानतळावर (बंगळुरु ) नियमीत तपासणीवेळी धावपट्टीवर विमानाच्या टायरचे काही तुकडे सापडले. हे तुकडे एअर एशियाच्या विमानाचे असल्याचे व्यवस्थापनाच्या लक्षात आले. त्यामुळे हे विमान पुणे येथे उतरविण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, पुणे विमानतळावर विमानाची तपासणी करण्यात आली. या वेळी विमानाच्या क्रमांक 3 च्या टायरला चिरा गेल्याचे आढळून आले. या विमानाची पुढील उड्डाने रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
ट्विट