Ahmedabad Shocker: क्रूरतेचा कळस! अहमदाबादमध्ये शिक्षकाने विद्यार्थ्याला केली बेदम मारहाण; व्हिडिओ व्हायरल, शाळेला नोटीस जारी (Watch)
हा व्हिडिओ अहमदाबादच्या वाटवा भागातील माधव पब्लिक स्कूलचा असल्याचे सांगण्यात येत आहे. व्हिडिओमध्ये एक शिक्षक विद्यार्थ्याला बेदम मारहाण करत असल्याचे दिसत आहे.
शिक्षकाला देवापेक्षा वरचा दर्जा देण्यात आला आहे. मात्र शिक्षक या शब्दाला, पदाला कलंक लावणारी धक्कादायक घटना गुजरातमधील अहमदाबादमधून समोर आली आहे. येथे एका शिक्षकाने एका निष्पाप विद्यार्थ्यावर अमानुष अत्याचार केला आहे. शिक्षकाने मुलाला बेदम मारहाण केली आहे. ही घटना वर्गात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ अहमदाबादच्या वाटवा भागातील माधव पब्लिक स्कूलचा असल्याचे सांगण्यात येत आहे. व्हिडिओमध्ये एक शिक्षक विद्यार्थ्याला बेदम मारहाण करत असल्याचे दिसत आहे. एवढ्या क्रूरतेने त्याचे समाधान झाले नाही तेव्हा त्याने त्या निष्पाप विद्यार्थ्याचे डोके भिंतीवर आपटले. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शाळेला नोटीस पाठवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. शाळेकडून एका दिवसात खुलासा मागवला आहे. (हेही वाचा: Palghar Crime: पालघर येथील आश्रम शाळेतील खळबळजनक घटना; दोन लाडू का घेतले म्हणून शिक्षकाकडून विद्यार्थ्याला बेदम मारहाण, उपचारासाठी रुग्णालयात दाखल)
अहमदाबादमध्ये शिक्षकाने विद्यार्थ्याला केली बेदम मारहाण-
वायरल वीडियो अहमदाबाद के एक प्राइवेट स्कूल का बताया जा रहा है। क्रूरता की हद पार करता ये शिक्षक है या राक्षस?? pic.twitter.com/bdboTumpsZ
— SANJAY TRIPATHI (@sanjayjourno) October 2, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 02, 2024 02:11 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

