Agra: काय सांगता? पतीच्या पसंतीची साडी नेसण्यास पत्नीचा नकार; घटस्फोटासाठी जोडपे पोहोचले न्यायालयात
पत्नी आपल्या आवडीची साडी नेसण्यास नकार देणे हे याचिका दाखल करण्यामागचे कारण असल्याचे सांगितले जात आहे. एका साडीवरून सुरु झालेला वाद आता न्यायालयापर्यंत पोहोचला आहे.
पती-पत्नीमधील वादाचे एक विचित्र प्रकरण आग्रा येथून समोर आले आहेत. येथे एका पतीने पत्नीविरोधात घटस्फोटाची याचिका दाखल केली. पत्नी आपल्या आवडीची साडी नेसण्यास नकार देणे हे याचिका दाखल करण्यामागचे कारण असल्याचे सांगितले जात आहे. एका साडीवरून सुरु झालेला वाद आता न्यायालयापर्यंत पोहोचला आहे. आग्रा येथील रहिवासी असलेल्या दीपकने सांगितले की, आठ महिन्यांपूर्वी हातरस जिल्ह्यातील एका महिलेशी त्याचे लग्न झाले होते. लग्नानंतर दीपकला वाटायचे की त्याच्या पत्नीने त्याच्या आवडीची साडी नेसावी, मात्र पत्नी नेहमी स्वतःच्या आवडीची साडी नेसायची. याच कारणावरून त्यांच्यात रोज भांडणे व्हायची. यानंतर हे प्रकरण कौटुंबिक समुपदेशन केंद्रापर्यंत पोहोचले, परंतु त्यावर तोडगा निघू शकला नाही. अखेर हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले आणि पती-पत्नीने आपल्याला घटस्फोट हवा असल्याचे सांगितले. जोडप्याने एकमेकांविरुद्ध मानसिक छळाच्या तक्रारी दाखल केल्या आहेत. या प्रकरणाची सुनावणी मार्चमध्ये होणार आहे. (हेही वाचा: Himachal Pradesh Wedding: बर्फाळ प्रदेशात पार पडला लग्न सोहळा, पाहा व्हायरल Video)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)