Legal Age for Sex: सहमतीने लैंगिक संबंध ठेवण्याचे वय 18 वरून 16 करावे; High Court ची केंद्राला विनंती

या प्रकरणी 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी कोचिंग डायरेक्टर तीन वर्षांपासून तुरुंगात आहे.

Sex | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

ग्वाल्हेर उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला सहमतीने लैंगिक संबंध ठेवण्याचे वय 18 वरून 16 वर आणण्याची विनंती केली आहे. बलात्कार प्रकरणाच्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने टिपण्णी केली की, इंटरनेटच्या जमान्यात मुले लवकर तरुण होत आहेत. म्हणूनच संमतीने संबंध बनवण्याचे वय 16 वर्षे असावे. उच्च न्यायालयाने म्हटले की, सोशल मीडिया आणि इंटरनेटच्या युगात आता 14 वर्षांची मुले तरुण होत आहेत.

या प्रकरणी 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी कोचिंग डायरेक्टर राहुल तीन वर्षांपासून तुरुंगात आहे. कोचिंग ऑपरेटरने मुलीशी संमतीने संबंध असल्याचा पुरावा सादर करून त्याच्याविरुद्ध दाखल केलेला बलात्काराचा एफआयआर रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली आहे. सहमतीने लैंगिक संबंध ठेऊनही या 17 वर्षीय विद्यार्थिनीने बलात्काराचा आरोप केला होता. राहुलला 17 जुलै 2020 रोजी या मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. तेव्हापासून तो तुरुंगात आहे. (हेही वाचा: MP Shocker: काय सांगता? न्यायालयाने आरोपीला सुनावली 170 वर्षांची शिक्षा; सागर जिल्ह्यातील अनोखे प्रकरण, जाणून घ्या काय होता गुन्हा)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now