Abhinav Arora Approaches Mathura Court: अभिनव अरोरा उर्फ ​​बाल संत बाबाची मथुरा कोर्टात धाव; खोट्या दाव्यांबद्दल 7 यूट्यूबर्सवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

अभिनव अरोराच्या कुटुंबीयांनी आज मथुरा कोर्टात पोहोचून 7 यूट्यूबवर गुन्हा नोंदवण्याची मागणी केली. अहवालानुसार, अभिनवच्या कुटुंबाने 19 ऑक्टोबरला पोलिसांत तक्रार केली होती, मात्र पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नसल्याचे त्यांनी सांगितले.

Abhinav Arora (Photo Credits: X/@SachinGuptaUP)

Abhinav Arora Approaches Mathura Court: सध्या सोशल मीडियावर स्वतःला बाल संत म्हणवणाऱ्या अभिनव अरोराचे नाव चर्चेत आहे. अभिनवला नुकतेच जगद्गुरू रामभद्राचार्य यांनी मंचावर फटकारले होते. रामभद्राचार्य यांनी अभिनवला मंचावरून खाली जाण्यासही सांगितले होते. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे व अभिनव आणि त्याच्या कुटुंबाला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. आता अभिनव अरोराच्या कुटुंबीयांनी आज मथुरा कोर्टात पोहोचून 7 यूट्यूबवर गुन्हा नोंदवण्याची मागणी केली. अहवालानुसार, अभिनवच्या कुटुंबाने 19 ऑक्टोबरला पोलिसांत तक्रार केली होती, मात्र पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर आज त्यांनी कोर्टात धाव घेतली.

तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काही युट्युबर्सनी अभिनवला खूप जास्त ट्रोल केले होते. त्यावर अभिनव म्हणतो, हे लोक माझ्या भक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. त्यामुळे मी सात यूट्यूबर्सवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत कोर्टात धाव घेतली आहे. अभिनव अरोराचे वकील आझाद खाकर यांनी सांगितले की, अभिनव अरोराच्या आईने मथुरा कोर्टात एक अर्ज दाखल केला आहे, ज्यामध्ये सात यूट्यूबर्सविरुद्ध वेगवेगळ्या कलमांखाली गुन्हा नोंदवण्याची मागणी करण्यात आली आहे. अभिनवच्या कुटुंबाने सांगितले की, या ट्रोलिंगनंतर त्यांना धमक्याही मिळत आहेत. (हेही वाचा: Tirupati Iskcon Temple Bomb Threat: बॉम्बच्या धमकीनंतर तिरुपतीतील इस्कॉन मंदिरात सुरक्षा वाढवली; पोलीस तपास सुरू)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now