Crocodile Climb Railing: तब्बल 10 फुटांच्या मगरीचा लोखंडी कुंपणावर चढण्याचा प्रयत्न..; उत्तर प्रदेशमधील बुंदेलशहरातील थरार (Watch Video)

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Photo Credit -X

Crocodile Climb Railing: उत्तर प्रदेशमधील बुंदेलशहरात (Bulandshah) एक मगर फिरत फिरत रहदारीच्या रस्त्यावर येऊन पोहचली. ऐरवी माणसे जास्त नजरेस न पाहणारी ही मगर(crocodile) अचानक माणसांना पाहून सैरभैर झाली आणि तिन धाडस दाखवत थेट गंगा पात्रात जाण्यासाठी लोखंडी कुंपण (Climb Railing)पार करण्याचा प्रयत्न केला. बुधवारी सकाळी घडलेल्या बुदेलशहरमधला हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. उंचीचे लोखंडी चढणे मगरीला कठीण ठरले. तब्बल 10 फुटांची ही मगरी होती. मात्र, तिचा तो प्रयत्न अयशस्वी झाला. शेपटीच्या आधाराने मगरीने कुंपणावर चढण्याचा प्रयत्न केला. पाण्यात जाण्सालाठी मगरीचे प्रयत्न पाहून आजूबाजूला असलेले लोक चांगलेच घाबरले होते. लाईव्ह हिंदूस्तानने दिलेल्या वृत्तानुसार वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मगरीला पकडून पांढऱ्या कापडात गुंडाळून पुन्हा पाण्यात नेऊन सोडलं. (हेही वाचा:DJ Sandy Murder Video: भरदिवसा ठो,ठो,ठो...; किरकोळ वादातून डीजे संदीप उर्फ सँडीची गोळ्या झाडून हत्या (Watch Video) )

पहा पोस्ट-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)