'One Nation One Election' Bill: लोकसभेत मांडले गेले ‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ विधेयक; विरोधकांनी केला विरोध (Watch)
लोकसभेत मांडण्यात आलेल्या,’वन नेशन, वन इलेक्शन’ विधेयकाला आम आदमी पार्टी (आप), काँग्रेस, टीएमसी, समाजवादी पार्टीसह अनेक विरोधी पक्षांनी विरोध केला आहे.
'One Nation One Election' Bill: ‘एक राष्ट्र एक निवडणूक’ विधेयक आज लोकसभेत सादर करण्यात आले. केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी मंगळवारी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेण्यासाठी घटना दुरुस्ती विधेयक सादर केले. यानंतर, हे विधेयक सर्वसमावेशक चर्चा करण्यासाठी संसदेच्या संयुक्त समितीकडे पाठवले जाऊ शकते. मेघवाल हे विधेयक संसदेच्या संयुक्त समितीकडे पाठवण्याची विनंती सभापती ओम बिर्ला यांना करू शकतात. मात्र, या विधेयकाला मंत्रिमंडळात मंजुरी देण्यात आली आहे. अधिवेशन सुरू होण्यापूर्वी काँग्रेस पक्षाने लोकसभेत नोटीस बजावली. या नोटीसमध्ये ‘वन नेशन वन इलेक्शन’ विधेयकाला विरोध करण्यात आला होता. लोकसभेत मांडण्यात आलेल्या,’वन नेशन, वन इलेक्शन’ विधेयकाला आम आदमी पार्टी (आप), काँग्रेस, टीएमसी, समाजवादी पार्टीसह अनेक विरोधी पक्षांनी विरोध केला आहे. (हेही वाचा: Parliament Winter Session: अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला करण्यासाठी काँग्रेस परिवाराने संविधान बदलले; पंतप्रधान मोदींचा लोकसभेत काँग्रेसवर जोरदार निशाणा)
लोकसभेत मांडले गेले ‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ विधेयक-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)