'Air India Flight AI159 आज रद्द होण्यामागे तांत्रिक दोष नव्हे तर विमानाची अनुपलब्धता' - Air India चं स्पष्टीकरण जारी

अहमदाबाद लंडन विमान रद्द झाल्याने 17 जून रोजी लंडन गॅटविक ते अमृतसर ही फ्लाइट AI170 देखील रद्द करण्यात आली आहे.

Air India Flight Representative Image | X @ Air India

अहमदाबाद ते गॅटविक विमानाचा 12 जून दिवशी अपघात झाल्यानंतर आता सारीच विमानं विशेष काळजी घेऊन चालवली जात आहे. आज त्याच रूट वर जाणारे फ्लाइट AI159 रद्द करण्यात आली आहे. सुरूवातीला रिपोर्ट्स मध्ये पुन्हा तांत्रिक दोषामुळे विमान रद्द झाल्याचे सांगण्यात आले होते मात्र आता एअर इंडियाने दिलेल्या माहितीमध्ये विमान उपलब्ध नव्हते, हवाई क्षेत्रावरील निर्बंध आणि अतिरिक्त खबरदारीच्या तपासणीमुळे विमान नेहमीपेक्षा जास्त वेळ थांबल्याने रद्द झाल्याचं सांगण्यात आले आहे. "आमच्या प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल आम्हाला खेद आहे आणि त्यांना त्यांच्या गंतव्यस्थानावर पोहोचवण्यासाठी पर्यायी व्यवस्था केली आहे. आम्ही हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करत आहोत आणि प्रवाशांनी रद्द केल्यास किंवा मोफत वेळापत्रक बदलल्यास पूर्ण परतफेड देखील देत आहोत. परिणामी, 17 जून रोजी लंडन गॅटविक ते अमृतसर ही फ्लाइट AI170 रद्द करण्यात आली आहे." असेही त्यांनी सांगितलं आहे. London-Bound Air India Flight Cancelled: अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या AI 159 विमानातही तांत्रिक बिघाड; उड्डाण रद्द .

अहमदाबाद ते गॅटविक विमान रद्द वरील एअर इंडियाची माहिती

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement