Meerut Hit-and-Run: भरधाव ट्रकची स्कूटीला धडक, चालक फरार, घटना सीसीटीव्हीत कैद
उत्तर प्रदेशातील मेरठ येथे एक भीषण अपघात घडला आहे. मेरठ येथील लालकुर्ती पोलिस स्टेशनच्या हद्दीत सरकारी इंटर कॉलेजसमोर एका टॅक्टरची स्कूटीला धडक लागली. हा अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
Meerut Hit-and-Run: उत्तर प्रदेशातील मेरठ येथे एक भीषण अपघात घडला आहे. मेरठ येथील लालकुर्ती पोलिस स्टेशनच्या हद्दीत सरकारी इंटर कॉलेजसमोर एका टॅक्टरची स्कूटीला धडक लागली. हा अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.अपघाताची माहिती मिळताच, घटनास्थळी अधिकाऱ्यांनी त्वरीत प्रतिसाद दिला. या अपघातात स्कूटी चालक गंभीर जखमी झाला. स्थानिकांनी त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. अपघातानंतर टॅक्टर चालकाने पळ काढला आहे.जखमी तरुण ऑटोमोबाईल कंपनीत काम करते. पोलिसांनी अपघाताची नोंद घेतली आहे. पोलिस ट्रॅक्टर चालकाचा शोध घेत आहे. (हेही वाचा- बेदारकपणे कार चालवणे जीवाशी बेतले, दोघांचा मृत्यू, नागपूरातील अपघाताचा व्हिडिओ व्हायरल)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)