Assam Fire: आसाम येथील नागाव येथे भीषण आग, मोठ्या प्रमाणात मालमत्तेचे नुकसान

आसाममधील नागाव येथे भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. या आगीत मोठ्या प्रमाणात मालमत्तेचे नुकसान झाले.

Fire | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

 Assam Fire: आसाममधील नागाव येथे भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. या आगीत मोठ्या प्रमाणात मालमत्तेचे नुकसान झाले. आसामधील नागाव जिल्ह्यातील काठमिल चारियालीजवळ भीषण आग लागली. रविवारी रात्री ही घटना घडली असून या भीषण आगीत लाखो रुपयांची मालमत्ता जळून खाक झाली आहे. या आगीत किमान पाच घरांचे नुकसान झाले आहे. अद्याप कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याचे वृत्त नाही. आगीची नेमके कारण अद्याप समोर आले नाही. आगीची माहिती मिळताच, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. घरांना आग लागली त्या घरांच्या वरच्या भागातून धुराचे दाट लोट दिसल्याने रस्त्यावर मोठी घबराट पसरली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement