Congress New President: मल्लिकार्जुन खरगे बनले काँग्रेसचे नवे अध्यक्ष; 7000 हून अधिक मते मिळाली

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे काँग्रेसचे नवे अध्यक्ष बनले आहेत. खरगे यांना 7000 हून अधिक मते मिळाली आहेत.

मल्लिकार्जुन खर्गे (Photo Credit: ANI)

Congress President Election: 17 ऑक्टोबर 2022 रोजी विविध राज्यांमध्ये स्थापन केलेल्या मतदान केंद्रांवर काँग्रेस अध्यक्षपदासाठी मतदान झाले. मतदान प्रक्रियेत 9500 हून अधिक प्रतिनिधींनी भाग घेतला होता. काँग्रेसच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी 96 टक्के मतदान झाल्याचा दावा केला होता. आज काँग्रेस कार्यालयात मतमोजणीची प्रक्रिया सुरू झाली होती. सर्व राज्यातील मतपत्रिका एकत्र करून मतमोजणी करण्यात आली. आता काँग्रेस अध्यक्ष पदाचा निकाल समोर आला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे काँग्रेसचे नवे अध्यक्ष बनले आहेत. खरगे यांना 7000 हून अधिक मते मिळाली आहेत. तर शशी थरूर यांना 1000 हून अधिक मते मिळाली आहेत.

यावेळी गांधी घराण्यातील एकही सदस्य अध्यक्षपदाच्या शर्यतीत सामील नव्हता. गेल्या 24 वर्षात पहिल्यांदाच गांधी घराण्याबाहेरचा नेता अध्यक्षपदावर पोहोचला आहे. यापूर्वी सीताराम केसरी असे अध्यक्ष होते, जे गांधी घराण्यातील नव्हते.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now