Hijab Controversy: जावेद अख्तर हिजाबवर झालेल्या वादावर म्हणाले, समर्थन करत नाही पण मुलींना धमकावणाऱ्या गुंडांना मी विचारतो, ही मर्दानगी आहे का?

मी कधीच बुरखा आणि हिजाबच्या बाजूने नव्हतो. मी आताही तेच म्हणतो. पण मला या गुंडांच्या जमावाचा राग येतो, मुलींना धमकावणाऱ्या गुंडांना मी विचारतो, ही मर्दानगी आहे का?

Javed Akhtar | (Photo Credits: Twitter)

कर्नाटकातील हिजाब प्रकरणी आता जावेद अख्तर यांची प्रतिक्रिया आली आहे. हे सर्व अत्यंत वाईट असल्याचे त्यांनी गुरुवारी सांगितले. वास्तविक, कर्नाटक सरकारने शाळा आणि महाविद्यालयांमध्ये हिजाबवर बंदी घालण्यास सांगितले, त्यावरून बराच वाद झाला. जावेद अख्तर यांनी ट्विट केले की, मी कधीच बुरखा आणि हिजाबच्या बाजूने नव्हतो. मी आताही तेच म्हणतो. पण मला या गुंडांच्या जमावाचा राग येतो, मुलींना धमकावणाऱ्या गुंडांना मी विचारतो, ही मर्दानगी आहे का?

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement