Amarnath Yatra Registration: जम्मू मध्ये अमरनाथ यात्रेसाठी ऑफलाईन रजिस्ट्रेशन प्रक्रियेला सुरूवात; भाविकांची मोठी गर्दी

आजपासून टोकन दिले जातील. टोकन घेणाऱ्या यात्रेकरूंना दुसऱ्या दिवशी, गुरुवारपासून तत्काळ नोंदणीची सुविधा उपलब्ध होणार आहे.

Amarnath Yatra Registration | X

जम्मू मध्ये अमरनाथ यात्रेसाठी ऑफलाईन रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू झाली आहे. सध्या भाविकांची यासाठी मोठी रांग पहायला मिळत आहे. दरम्यान ही यात्रा 29 जून पासून सुरू होत आहे. आजपासून तत्काल नोंदणी सुविधा सुरू होत आहे. यासाठी शहरात विविध ठिकाणी पाच केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. याशिवाय टोकन सेंटर तयार करण्यात आले आहे. आजपासून टोकन दिले जातील. टोकन घेणाऱ्या यात्रेकरूंना दुसऱ्या दिवशी, गुरुवारपासून तत्काळ नोंदणीची सुविधा उपलब्ध होणार आहे. प्रवाशांची नोंदणी विहित मार्ग आणि तारखेनुसारच केली जाईल. अशी माहिती देण्यात आली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement