EAM S Jaishankar Dares Rahul Gandhi: मी परदेशात जाऊन राजकारण करत नाही, मी घरी गेल्यावर त्यांना उत्तर देईन; एस जयशंकर यांचा राहुल गांधींवर निशाणा

दरम्यान, भारतीय वंशाच्या व्यक्तीने राहुल गांधी यांचे नाव न घेता त्यांच्या अमेरिका दौऱ्याबाबत प्रश्न केला. यावर जयशंकर म्हणाले, "बघा, मी माझ्यासाठी बोलू शकतो. मी परदेशात गेल्यावर राजकारण न करण्याचा प्रयत्न करतो. जर मला वाद घालायचा असेल तर. मी ते माझ्या देशात करेन.

S Jaishankar (PC - ANI)

EAM S Jaishankar Dares Rahul Gandhi: काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या अमेरिकेत असून, तिथे त्यांनी मोदी सरकारवर टीका केली. यावरून आता भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी भारतीय परराष्ट्र मंत्री सध्या दक्षिण आफ्रिकेत पोहोचले आहेत. जयशंकर केपटाऊनमध्ये भारतीय समुदायाच्या लोकांशी बोलत होते. दरम्यान, भारतीय वंशाच्या व्यक्तीने राहुल गांधी यांचे नाव न घेता त्यांच्या अमेरिका दौऱ्याबाबत प्रश्न केला. यावर जयशंकर म्हणाले, "बघा, मी माझ्यासाठी बोलू शकतो. मी परदेशात गेल्यावर राजकारण न करण्याचा प्रयत्न करतो. जर मला वाद घालायचा असेल तर. मी ते माझ्या देशात करेन. लोकशाही देशात प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी, राष्ट्रहित, सामूहिक प्रतिमा असते. काही गोष्टी राजकारणाच्या वरच्या असतात. देशाबाहेर पाऊल ठेवताना या गोष्टी लक्षात ठेवाव्यात. पण याचं उत्तर मी घरी जाऊन देईन." (हेही वाचा - Odisha Train Accident: रेल्वे अपघात कसे टाळता येऊ शकतात? भारत 'या' देशांकडून प्रगत तंत्रज्ञान प्रणाली अवगत करू शकतो; काय आहे रेल्वे अपघात रोखण्याचं तंत्रज्ञान? जाणून घ्या)