Telangana Road Accident Videos: अनिंयत्रित कारच्या धडकेत घोड्याचा मृत्यू, सहा जण जखमी,मेडक येथील घटना
अनियंत्रित कारने घोड्याला धडक दिली. या धडकेत मुक्या जनावराचा मृत्यू झाला. या अपघातात सहा जण गंभीर जखमी झाले.
Telangana Road Accident Videos: हैद्राबादकडून मेडककडे जाणाऱ्या एका कारचा भीषण अपघात झाला आहे. अनियंत्रित कारने घोड्याला धडक दिली. या धडकेत मुक्या जनावराचा मृत्यू झाला. या अपघातात सहा जण गंभीर जखमी झाले. या धडकेत आणखी दोन वाहनांना धडक लागली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. व्हायरल व्हिडिओत घोड्याचा मृत्यू झाल्याचे दिसत आहे.या घटनेनंतक प्राणी प्रेमींना संताप व्यक्त केला आहे. ही घटना रविवारी नरसापूर येथील कोवडीपल्ली येथे घडली. या अपघातानंतर रस्त्यावर बराच वेळ गोंधळ निर्माण झाला होता. अपघातात वाहनांचे नुकसार झाले आहेत. या अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. पोलिस या प्रकरणी तपासणी करत आहे. (हेही वाचा- काश्मिरा येथे मेट्रो स्टेशनचा काही भाग पडल्याने तरुणाच्या डोक्याला दुखापत; X वापरकर्त्याने MMRDA वर केला सुरक्षा प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्याचा आरोप (Watch Video)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)