Lok Sabha Election 2024 Result: मथुरा मतदारसंघातून हेमा मालिनी आघाडीवर, भाजप पक्षाबाबत केलं खास वक्तव्य (Watch Video)

भारतीय जनता पार्टी उमेदवार आणि मथुराच्या खासदार हेमा मालिनी यांनी आज त्यांच्या नेतृत्वाबाबत आणि भाजप पक्षाबाबत वक्तव्य केले आहे.

Hema Malini (फोटो सौजन्य - फेसबुक)

Lok Sabha Election 2024 Result: भारतीय जनता पार्टी उमेदवार आणि मथुराच्या खासदार हेमा मालिनी यांनी आज त्यांच्या नेतृत्वाबाबत आणि भाजप पक्षाबाबत  वक्तव्य केले आहे. हेमा मालिनी म्हणाल्या की हा रोमांचक क्षण आहे आणि मला विश्वास आहे की, आमचा पक्ष पुन्हा सत्तेत येईल आणि आम्ही नक्कीच सरकार स्थापन करू, मला मथुरेतूनही चांगली आघाडी मिळत आहे. सध्या सर्व काही ठिक चालले आहे. हेमा मालिनी मथुरा मतदारसंघातून पहिल्या फेरीतून 48,110 मतांनी आघाडीवर आहेत. त्यामुळे भाजप पक्षात आनंदाचे वातावरण झाले आहे. (हेही वाचा - उत्तर प्रदेश कन्नौजमधून अखिलेश यादव 35 हजार मतांनी आघाडीवर)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now