Haryana Shocker: व्यावसायिकाची आई आणि पत्नीसमोर केली हत्या, भयावह घटनेचा Video व्हायरल
गँगस्टेर लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीतील्या सदस्यांनी हरियाणाच्या रोहतक येथील ढाब्यावर एका व्यवसायिकाची हत्या केली आहे.
Haryana Shocker: गँगस्टेर लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीतीले सदस्यांनी हरियाणाच्या रोहतक येथील ढाब्यावर एका व्यवसायिकाची हत्या केली आहे.या घटनेचा सीसीटीव्ही फुटेड देखील समोर आला आहे. पीडितेच्या आई आणि पत्नी समोरच गोळी झाडून हत्या केली. पीडितेच्या आईने हल्लेखोरांसमोर खुप विनंती केली परंतु त्यांनी एक ऐकले नाही आणि बेधडकपणे गोळी झाडली. ही घटना 29 फेब्रुवारीच्या रात्री 10.56 वाजता घडली. या भयावह घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. हरियाणातील या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. या खून प्रकरणातील पीडितेचे नाव सचिन मुंजाल असे असून तो गुरुग्रामचा रहिवासी आहे. या घटनेची लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या रोहित गोदारने जबाबदारी स्वीकारली आहे. हेही वाचा- 19 वर्षीय तरूणीवर सामुहिक बलात्कार; भविष्यात खंडणीवसूली च्या उद्देशाने सारा प्रकार कॅमेर्यात कैद