Gujarat News: बोअरवेलमधून वाचवण्यात आल्यानंतर चिमुकलीचा मृत्यू, गुजरातमधील द्वारका येथील घटना

नववर्षाच्या सुरुवातीला गुरजरात मध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. राज्याच्या द्वारका जिल्ह्यात एका बोअरवेलमध्ये तीन वर्षाची मुलगी पडली होती.

Gujarat PC ANI

Gujarat News:नववर्षाच्या सुरुवातीला गुरजरात मध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. राज्याच्या द्वारका जिल्ह्यात एका बोअरवेलमध्ये  तीन वर्षाची मुलगी पडली होती. आठ तासांच्या ऑपरेशनंतर तिला वाचवण्यात आले होते. तिला बचावल्यानंतर एका तासांच्या आत तिचा दुर्दैवी मृत्यू झाला अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. बोअरवेलमधून काढून तिला रुग्णालयात नेण्यात आले होते दरम्यान तिचा मृत्यू झाला. एंजल साखरा असे या मुलीचे नाव आहे. तिला खंभलिया शहरातील सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मुलीचा मृत्यू झाला अशी माहिती डॉक्टरांनी दिली.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement