Gujarat Fire Videos: नडियाड मार्केट मध्ये अग्नितांडव; शॉर्ट सर्किटने आग लागल्याने तीन दुकाने, दोन वाहने जळून खाक
गुजरातमधील नडियाड येथील एका मार्केटमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. आग इतकी भीषण होती की या आगीत तीन दुकाने आणि दोन वाहने जळून खाक झाली आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने आग आटोक्यात आणली असून कोणतीही जीवितहानी झाली नाही.
Gujarat Fire Videos: गुजरातमधील नाडियाड मार्केट (Nadiad Market) परिसरात आज रविवार २८ एप्रिल रोजी शॉर्ट सर्किटमुळे आगीची भीषण परिस्थीती निर्माण झाली. आगीत तीन दुकाने आणि दोन वाहने जळून खाक झाली आहेत. जिल्हा अग्निशमन अधिकारी दीक्षित पटेल यांनी या घटनेला दुजोरा देताना सांगितले की, अहमदाबादमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली. अग्निशमन दलाने तातडीने आग आटोक्यात आणली.(हेही वाचा :Noida Fire Video: उत्तर प्रदेशातील नोएडा सेक्टर 65 येथील इमारतीला भीषण आग, बचाव कार्य सुरु )
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement