Delhi Fire: दिल्लीतील शाहदरा परिसरात आग, कुलिंगचे काम सुरु
आगीची माहिती मिळताच, अग्निशमन दलाच्या गाड्या आणि पोलिस कर्मचारी घटना स्थळी आले.
Delhi Fire: दिल्लीतील शाहदरा परिसरातील एका घराला भीषण आग लागल्याची घटना समोर येत आहे. आगीची माहिती मिळताच, अग्निशमन दलाच्या गाड्या आणि पोलिस कर्मचारी घटना स्थळी आले. आग विझवण्याचे काम सुरु आहे. या संदर्भात अधिक माहितीची प्रतीक्षा आहे. दिल्ली पोलिसांना या घटनेची नोंद घेतली आहे. आगीमुळे परिसरात हाहाकार माजला आहे. धुरांचे लोट परिसरात पसरत आहे. शाहदरा येथील डीसीपीं सुरेंद्र चौधरी यांनी सांगितले की, "आम्हाला गीता कॉलनी पोलिस स्टेशनला सकाळी साडेपाच वाजता एका घरात मोठी आग लागल्याचा फोन आला. त्यानुसार स्थानिक पोलिस, अग्निशमन दल, रुग्णवाहिका आणि पीसीआर व्हॅन घटनास्थळी दाखल झाल्या. 9 लोकांना वाचवण्यात आले आणि त्यांना रुग्णालयात पाठवण्यात आले."( हेही वाचा- डोंबिवलीच्या पलावा सिटीतील इमारतीला भीषण आग, रहिवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)