Accident On Yamuna Expressway: यमुना एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; दोन बसच्या धडकेत 40 प्रवासी जखमी, (Watch Video)

या अपघातात एकूण 40 प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे. अपघाताची माहिती मिळताच प्रशासनाने जखमी प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

Accident On Yamuna Expressway (PC - X/@PTI_News)

Accident On Yamuna Expressway: उत्तर प्रदेशचा यमुना एक्सप्रेस वे गेल्या अनेक दिवसांपासून अपघातांच्या चर्चेत आहे. सोमवारी येथे पुन्हा एकदा भीषण अपघात झाला. यमुना एक्स्प्रेस वेवर पहाटे तीनच्या सुमारास दोन बसमध्ये भीषण टक्कर झाली. या अपघातात एकूण 40 प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे. अपघाताची माहिती मिळताच प्रशासनाने जखमी प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मिळालेल्या माहितीनुसार, यमुना एक्स्प्रेस वेवर मथुराजवळील माईल स्टोन 110 राया कट येथे पहाटे तीन वाजता दोन बस एकमेकांवर आदळल्या. या अपघातात 40 जण जखमी झाले असून त्यापैकी 31 जखमींना जिल्हा रुग्णालयात तर 9 जखमींना विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (हेही वाचा - Cylinder Explosion In Pune: सिलिंडरच्या स्फोटामुळे मार्केट यार्डातील झोपडपट्टीला भीषण आग; पहा व्हिडिओ )

पहा व्हिडिओ - 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif