Transfer Certificate: आता 'शाळा स्थलांतर प्रमाणपत्रा'शिवायही विद्यार्थ्यांना मिळणार अन्य शाळेत प्रवेश; शिक्षण मंत्री Deepak Kesarkar यांची माहिती

अभावी प्रवेश नाकारण्यात येवू नये. याबाबत माध्यमिक शाळा संहितेतील तरतुदीनुसार विद्यार्थ्यांना तात्पुरता प्रवेश देवून पुढील आवश्यक कार्यवाही करण्यात यावी.

Deepak Kesarkar | (Photo Credit - Twitter)

राज्यातील कोणत्याही अभ्यासक्रमाच्या शाळेत ‘शाळा स्थलांतर प्रमाणपत्रा’अभावी (Transfer Certificate) विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात येऊ नये, असे आवाहन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले आहे. 1 ली ते 10 वी विद्यार्थ्यांच्या सुलभ प्रवेशाबाबतचा शासन निर्णय जारी झाला. त्यामध्ये म्हटले आहे, राज्यातील कोणत्याही शासकीय/ महानगरपालिका/ नगरपालिका/ खाजगी अनुदानित/ कोणत्याही व्यवस्थापनाकडून स्वयंअर्थसहाय्यित तत्त्वावर चालविण्यात येणारी व कोणत्याही भारतीय वा परदेशी अभ्यासक्रम अथवा मंडळास संलग्न असलेल्या प्राथमिक शाळेत इयत्ता 1 ली ते 8 वी च्या वर्गात अन्य शाळेतून विद्यार्थी प्रवेशासाठी मागणी करीत असेल, अशा विद्यार्थ्यांना T.C. (Transfer Certificate) अभावी प्रवेश नाकारण्यात येवू नये. आरटीई अधिनियमातील कलम-4 अन्वये शालेय प्रवेशित न झालेल्या विद्यार्थ्यास वयानुरूप वर्गामध्ये प्रवेश देण्यात येईल असे नमूद आहे आणि कलम 14 (1) नुसार प्रवेशासाठी वयाचा पुरावा ग्राह्य समजण्यात यावा अशी तरतुद आहे.

पुढे म्हटले आहे, इयत्ता 9 वी ते 10 वी च्या वर्गात अन्य शाळेतून विद्यार्थी प्रवेशासाठी मागणी करीत असेल, अशा विद्यार्थ्यांना T.C. अभावी प्रवेश नाकारण्यात येवू नये. याबाबत माध्यमिक शाळा संहितेतील तरतुदीनुसार विद्यार्थ्यांना तात्पुरता प्रवेश देवून पुढील आवश्यक कार्यवाही करण्यात यावी.