RRB Examination Special Train: नागपूर आणि सिकंदराबाद दरम्यान चालवली जाणार आरआरबी परीक्षा विशेष ट्रेन; जाणून घ्या वेळ

यापैकी बहुतेक गाड्या 8 मे रोजी धावतील, जेणेकरून विद्यार्थ्यांना सकाळी लवकर त्यांच्या परीक्षा केंद्रांवर पोहोचता येईल

भारतीय रेल्वे (फोटो सौजन्य-फेसबुक)

आरआरबी एनटीपीसी 2022 सीबीटी-2 (RRB NTPC 2022 CBT-2) परीक्षा 9 आणि 10 मे रोजी देशभरातील परीक्षा केंद्रांवर घेतली जाईल. ही परीक्षा रेलवे भर्ती बोर्ड ग्रेड पे 4 आणि 6 पदवीधर पदांसाठी आयोजित. भारतीय रेल्वेने 9 आणि 10 मे रोजी परीक्षा देणाऱ्या उमेदवारांच्या सोयीसाठी देशभरात 65 हून अधिक विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यापैकी बहुतेक गाड्या 8 मे रोजी धावतील, जेणेकरून विद्यार्थ्यांना सकाळी लवकर त्यांच्या परीक्षा केंद्रांवर पोहोचता येईल आणि नंतर परीक्षा संपल्यानंतर त्यांना घरी परत नेण्यात मदत होईल. नागपूर आणि सिकंदराबाद दरम्यान आरआरबी परीक्षा विशेष ट्रेन चालवली जाणार आहे. या ट्रेनसाठीचे बुकिंग 6 मे रोजी सुरु होणार आहे. ही ट्रेन नागपूर येथून 7 मे रोजी दुपारी दीड वाजता सुटणार आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)