Jamia Millia Islamia Suspends MoUs With Turkey: राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव जेएनयुनंतर आता जामिया मिलिया इस्लामियानेही रद्द केले तुर्कीसोबतचे सामंजस्य करार
जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाने एका अधिकृत निवेदनात सांगितले की, राष्ट्रीय सुरक्षेच्या हितासाठी तुर्की सरकारशी संलग्न असलेल्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेशी असलेले सर्व सामंजस्य करार तात्काळ प्रभावाने रद्द करण्यात येत आहेत.
जवाहरलाल नेहरू विद्यापीठानंतर (JNU) आता जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाने तुर्कीच्या शैक्षणिक संस्थांशी असलेले सर्व सामंजस्य करार (MoUs) राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव तात्काळ प्रभावाने रद्द केले आहेत. हा निर्णय भारत आणि तुर्की यांच्यातील वाढत्या राजनैतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला आहे, विशेषतः तुर्कीने भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहिमेदरम्यान पाकिस्तानला पाठिंबा दिल्याच्या पार्श्वभूमीवर. जामिया मिलिया इस्लामियाने एक निवेदन जारी करून हे करार रद्द केल्याची घोषणा केली, आणि आपण देशाच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे स्पष्ट केले.
जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाने एका अधिकृत निवेदनात सांगितले की, राष्ट्रीय सुरक्षेच्या हितासाठी तुर्की सरकारशी संलग्न असलेल्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेशी असलेले सर्व सामंजस्य करार तात्काळ प्रभावाने रद्द करण्यात येत आहेत. तुर्कीने पाकिस्तानला पाठींबा दिल्याने, भारतात तुर्कीविरोधी भावना भडकल्या आहेत. ऑल इंडिया ट्रेडर्स कॉन्फरन्स (CAIT) ने 16 मे 2025 रोजी तुर्की आणि अझरबैजान यांच्याशी व्यापारी संबंध तोडण्याचा निर्णय घेण्यासाठी राष्ट्रीय परिषद बोलावली आहे. याशिवाय, अनेक व्यापाऱ्यांनी तुर्की आणि अझरबैजानशी व्यावसायिक संबंध तोडले आहेत. या पार्श्वभूमीवर, जेएनयू आणि जामिया मिलिया इस्लामियासारख्या शैक्षणिक संस्थांनीदेखील तुर्कीशी शैक्षणिक संबंध तोडले आहेत. *हेही वाचा: भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकला मदत करणार्या Azerbaijan, Turkey च्या पर्यटनावर भारतीयांचा बहिष्कार; 250% सहली रद्द झाल्याची MakeMyTrip ची माहिती)
Jamia Millia Islamia Suspends MoUs With Turkey: