HSC Examination: 12 वी परीक्षेच्या निकालावर काही आक्षेप असल्यास संबंधित विद्यार्थी विहित नमुन्यात 25 सप्टेंबर पर्यंत अर्ज करू शकतात
दि. 25 सप्टेंबर 2021 अखेर विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत. त्यानंतर आलेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत इयत्ता 12 वी परीक्षेचा सुधारित मूल्यमापन कार्यपद्धतीनुसार निकाल जाहीर केल्यानंतर, विद्यार्थ्यांना या निकालावर काही आक्षेप/तक्रारी असतील तर त्या संबंधित विद्यार्थ्यांनी विहित करण्यात आलेल्या नमुन्यात (प्रपत्र -अ) मध्ये अर्ज करण्याबाबत कळविले आहे. त्यानुसार दि. 25 सप्टेंबर 2021 अखेर विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत. त्यानंतर आलेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. याबाबत सर्व संबंधित उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांचे मुख्याध्यापक/प्राचार्य, विद्यार्थी, पालक व अन्य घटक यांनी नोंद घ्यावी. असे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ.अशोक भोसले यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)