English No Longer Mandatory Subject: इंग्रजीची सक्ती होणार रद्द? महाराष्ट्र SCERT ने 11वी-12वी साठी इंग्लिश मानली 'परकीय भाषा', जाणून घ्या सविस्तर

महाराष्ट्र शासनाच्या राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (SCERT) तयार केलेल्या अभ्यासक्रमाच्या मसुद्यामध्ये इंग्रजी भाषेबाबत काही शिफारशी केल्या आहेत. या मसुद्यामध्ये 11 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी शालेय शिक्षणात इंग्रजी भाषा अनिवार्य मानण्यात आलेली नाही.

Students | Twitter

English No Longer Mandatory Subject: इंग्रजी भाषा ही फार पूर्वीपासून आवश्यक भाषा मानली जात आहे. पालकही आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये शिकवण्यास प्राधान्य देतात. आता महाराष्ट्र शासनाच्या राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (SCERT) तयार केलेल्या अभ्यासक्रमाच्या मसुद्यामध्ये इंग्रजी भाषेबाबत काही शिफारशी केल्या आहेत. या मसुद्यामध्ये 11 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी शालेय शिक्षणात इंग्रजी भाषा अनिवार्य मानण्यात आलेली नाही. ती केवळ परदेशी भाषा मानून ती, निवडायची की नाही असा पर्याय देण्याची तयारी आहे. हा मसुदा जर अंमलात आणला गेला तर, यापुढे इंग्रजी भाषा अनिवार्य विषय राहणार नाही. मात्र, सध्याच्या अभ्यासक्रमात 11 वी आणि 12 वी या दोन्ही वर्गांसाठी अजूनही इंग्रजी हा अनिवार्य विषय आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, महाराष्ट्र एससीईआरटीने तयार केलेल्या मसुद्याच्या अभ्यासक्रमानुसार इयत्ता 11वी आणि 12वीसाठी आठ विषय असतील. यामध्ये दोन भाषा, चार ऐच्छिक विषय आणि दोन अनिवार्य विषयांचा समावेश आहे.

पहा पोस्ट-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement