CBSE 10th & 12th Date Sheet: सीबीएसईने जाहीर केली 10वी आणि 12वीच्या परीक्षेची डेटशीट; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
सीबीएसईने जाहीर केलेल्या डेटशीटनुसार परीक्षा दोन शिफ्टमध्ये होणार आहेत. पहिली परीक्षा सकाळी 10.30 पासून सुरू होणार असून दुपारी 1.30 पर्यंत चालणार आहे.
द्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) मंगळवारी इयत्ता 10वी आणि 12वीचे तारीखपत्रक जाहीर केले. जाहीर झालेल्या डेटशीटनुसार, दोन्ही परीक्षा 15 फेब्रुवारी रोजी सुरु होणार आहेत. 10वीची परीक्षा 13 मार्च रोजी संपणार आहे, तर 12वीची परीक्षा 2 एप्रिल रोजी संपणार आहे. सीबीएसईने जाहीर केलेल्या डेटशीटनुसार परीक्षा दोन शिफ्टमध्ये होणार आहेत. पहिली परीक्षा सकाळी 10.30 पासून सुरू होणार असून दुपारी 1.30 पर्यंत चालणार आहे. दुसरी परीक्षा सकाळी 10.30 ते दुपारी 12.30 या वेळेत होईल. यासह मंडळाने इयत्ता 10वी आणि 12वीच्या प्रात्यक्षिक परीक्षांचे डेटशीट प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार 10वी आणि 12वी या दोन्ही वर्गांच्या प्रात्यक्षिक परीक्षा 1 जानेवारीपासून सुरू होऊन 15 फेब्रुवारीला संपणार आहेत. सीबीएसई बोर्ड परीक्षा 2024 ची डेटशीट अधिकृत वेबसाइट cbse.gov.in आणि cbse.nic.in वर तपासली जाऊ शकते. (हेही वाचा: ICSE, ISC 2024 Date Sheet: 10वी, 12वीच्या बोर्ड परीक्षेच्या तारखा cisce.org वर जाहीर; कसं पहाल टाईम टेबल!)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)