CA Exams Postponement 2024: सीए परीक्षांच्या सुधारित वेळापत्रकाची विद्यार्थ्यांना आतुरता असताना फेक शेड्युल वायरल; सोशल मीडीयातही मिम्स चा पाऊस!

Online | Pixabay.com

लोकसभा निवडणूकांचे वेळापत्रक आणि सीए परीक्षांच्या एकत्र आल्याने ICAI कडून आता परीक्षेच्या तारखा स्थगित करून आज नव्या तारखा जाहीर करणार असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी देण्यात आली आहे. दरम्यान आज 19 मार्च दिवशी संध्याकाळपर्यंत icai.org या वेबसाईट वर नवं वेळापत्रक जारी केलं जाणार आहे. परंतू त्याआधीच फेक वेळापत्रक वायरल झालं आहे. विद्यार्थ्यांनी अधिकृत माहिती शिवाय अन्य कुठल्याही सूत्रांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन करण्यात आलं आहे मात्र सध्या वायरल होत वेळापत्रकावरून अनेक मिम्स देखील सोशल मीडीयात दिसत आहेत. CA May Exams 2024 Postponed: सीए च्या मे महिन्यातील परीक्षा लोकसभा निवडणूकांमुळे लांबणीवर; 19 मार्चला जाहीर होणार नवं वेळापत्रक .

पहा फेक वेळापत्रक

सीए विद्यार्थ्यांवरील मिम्स

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)