Dress Code For Devotees At Jagannath Temple: जगन्नाथ पुरी मंदिरामध्ये 1 जानेवारीपासून ड्रेस कोड लागू होणार; मंदिरात भाविकांना स्कर्ट, स्लीव्हलेस, हाफ पँट घालण्यास बंदी

वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, ड्रेस कोड लागू झाल्यानंतर लोकांना हाफ पँट, फाटलेल्या जीन्स, स्कर्ट आणि स्लीव्हलेस कपडे घालून जगन्नाथ मंदिरात जाता येणार नाही. मंदिराच्या धोरण उपसमितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

Jagannath Puri Temple (PC - Wikimedia Commons)

Dress Code For Devotees At Jagannath Temple: ओडिशाच्या पुरी येथील जगन्नाथ मंदिरात येणाऱ्या भाविकांना आता ड्रेस कोड पाळावा लागणार आहे. मंदिर व्यवस्थापनाने सोमवारी सांगितले की, पुढील वर्षी 1 जानेवारीपासून ड्रेस कोड लागू केला जाणार आहे. आजपासूनच भाविकांना ड्रेस कोडबद्दल जागरूक केले जाईल. वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, ड्रेस कोड लागू झाल्यानंतर लोकांना हाफ पँट, फाटलेल्या जीन्स, स्कर्ट आणि स्लीव्हलेस कपडे घालून जगन्नाथ मंदिरात जाता येणार नाही. मंदिराच्या धोरण उपसमितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, मंदिरात कोणते कपडे घालण्यास परवानगी द्यायची याचा निर्णय अद्याप झालेला नाही. जगन्नाथ मंदिर व्यवस्थापनाचे प्रमुख रंजन कुमार दास यांनी सांगितले की, काही लोक अशोभनीय कपडे घालून मंदिरात येतात. काही लोक हाफ पँट आणि स्लीव्हलेस कपडे घालून येतात, जणू ते समुद्रकिनारी किंवा उद्यानात फिरायला आले आहेत. देव मंदिरात राहतो. हे मनोरंजनाचे ठिकाण नाही. यामुळे इतर लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जातात.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement