Delhi Shocker: दिल्लीत बनावट पोलिस हवालदाराने अनेकांना लुबाडलं, एकाकडून दीड लाखांची केली मागणी

दिल्लीतील सागरपूर पोलिस ठाण्यात एका बनावट पोलिस विरोधात तक्रार देण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या बनवाट पोलिसाचा खेळ चालू होता.

Money (Photo Credits PTI)

Delhi Shocker: दिल्लीतील सागरपूर पोलिस ठाण्यात एका बनावट पोलिस विरोधात तक्रार देण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बनवाट पोलिसाचा खेळ चालू होता. एका पीडीत व्यक्तीकडून दीड लाख रुपये मागणी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपीने पीडीताला सागरपूर पोलिस ठाण्याचे पोलिस असल्याचे सांगितले आणि त्याला दीड लाखांची मागणी केली. या प्रकरणात पीडिताने पोलिसांना तक्रार दिली होती पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरा तपासले आणि आरोपीला शोधून काढले. लक्ष्मीनारायण असं आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपीकडून कागदपत्रे दाखवण्यास सांगितले तेव्हा त्याकडे कोणतेही योग्य कागदपत्रे नव्हते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने सरकारी निविदा दाखवून परिसरातील अनेकांना गंडा लावला आहे. (हेही वाचा- डेटिंग अॅपच्या माध्यमातून नाव बदलून तरुणीची फसवणूक; 10 लाखांना घातला गंडा)

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement