Dalit Student Abused and Assault at BHU : बनारस हिंदू विद्यापीठच्या हॉस्टेलमध्ये दलित विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न, पोलिसांकडून तपास सुरू
दोघांनी विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न केला. यात त्याला मारहाण ही करण्यात आली. सध्या, पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरू आहे.
Dalit Student Abused and Assault at BHU : गुजरातमधील अहमदाबाद येथून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. एका दलित विद्यार्थ्या((Dalit Student))वर बनारस हिंदू विद्यापीठ(Banaras Hindu University) च्या हॉस्टेलमध्ये दोघांनी अनैसर्गिक शारिरीक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केल्याची बाब समोर आली आहे. रविवारी, 31 मार्च रोजी उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे हा प्रकार घडला. या प्रकरणात दोघांनी पीडित विद्यार्थ्यावर अत्याचार करत आणि मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. हॉस्टेलच्या रूममध्ये पीडित विद्यार्थ्याची पॅन्ट खेचून दोघांनी त्याच्यासोबत अनैसर्गिक शारिरीक संबंध (( Unnatural Sex))प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. पीडित विद्यार्थी विद्यापीठात पदव्यूत्तर शिक्षण घेत आहे. या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.(हेही वाचा : Titanic Props Auction: टायटॅनिक चित्रपटामधील प्रॉप्सचा झाला लिलाव; रोझचा जीव वाचवणाऱ्या फळीची कोट्यावधी रुपयांना विक्री)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)