केंद्राकडून UPSC ला नोकरशाहीतील पार्श्विक प्रवेशासाठी नवीन जाहिरात रद्द करण्याचे आदेश
केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी मंगळवारी पंतप्रधान मोदी यांच्या निर्देशानुसार यूपीएससीतील पार्श्विक प्रवेशासाठी नवीन जाहिरात रद्द करण्याचे पत्र यूपीएससी अध्यक्षांना लिहिले आहे.
UPSC ने गेल्या शनिवारी 45 पदांसाठी जाहिरात काढली होती. ज्यात 10 सहसचिव आणि 35 संचालक/उपसचिव पदासाठी पार्श्विक प्रवेश (lateral entry)पद्धतीद्वारे जागा भरल्या जाणार होत्या. या योजनेचा उद्देश सरकारी विभागांमध्ये तज्ञ व्यक्तींचा समावेश करणे असा होता. आता केंद्राकडून UPSC ला नोकरशाहीतील पार्श्विक प्रवेशासाठी नवीन जाहिरात रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सन 2014 पूर्वी बहुतांश प्रमुख भरती ही पार्श्विक प्रवेश पद्धतीने केल्या गेल्या होत्या, ज्यात आता घोटाळे झाल्याचे समोर आले आहे. भरती प्रक्रिया संस्थात्मकदृष्ट्या चालविण्याचे, पारदर्शक पद्धतीने करण्याचे उद्दीष्ट आहे, असे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी (Jitendra Singh)पत्रात म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ठाम विश्वास आहे की पार्श्व प्रवेशाची प्रक्रिया आपल्या संविधानात समाविष्ट केलेल्या समानता आणि सामाजिक न्यायाच्या तत्त्वांशी जुळली पाहिजे, विशेषत: आरक्षणाच्या तरतुदींबाबत, असे पत्रात पुढे म्हणण्यात आले आहे.
पोस्ट पहा
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)