केंद्र सरकारने 16 यूट्यूब न्यूज चॅनेल केले ब्लॉक; देशविरोधी विचार, जातीय द्वेष पसरवल्याचा आहे आरोप
भारत सरकारने IT नियम 2021 अंतर्गत आणीबाणीच्या अधिकारांचा वापर करून हे YouTube चॅनेल ब्लॉक केले आहेत
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने भारताची राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र संबंध आणि सार्वजनिक सुव्यवस्थेशी संबंधित प्रचार करणारे 16 यूट्यूब न्यूज चॅनेल ब्लॉक केले आहेत. या 16 यूट्यूब चॅनेलपैकी 10 भारतीय आणि 6 पाकिस्तानमधून कार्यरत होते. भारत सरकारने IT नियम 2021 अंतर्गत आणीबाणीच्या अधिकारांचा वापर करून हे YouTube चॅनेल ब्लॉक केले आहेत. हे यूट्यूब चॅनेल देशविरोधी विचार, जातीय द्वेष आणि भारतात दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते. या चॅनेलचे 68 कोटींहून अधिक सदस्य होते.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)