West Bengal: संदेशखळी येथील घरातून सीबीआयने जप्त केला शस्त्रसाठा; घरात बॉम्ब असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर NSG चे पथक पोहोचले घटनास्थळी

संदेशखळी प्रकरणासंदर्भात आज सकाळपासून सीबीआय पश्चिम बंगालमध्ये अनेक छापे टाकत आहे. एजन्सीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीबीआयने शस्त्रेही जप्त केली आहेत. शुक्रवारी पुन्हा सीबीआयने संदेशखळीवर छापा टाकला. शहाजहान शेखचा जवळचा नातेवाईक अबू तालेब मोल्ला याच्या घरी मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि बॉम्ब ठेवण्यात आल्याची माहिती तपास यंत्रणेला मिळाली होती.

CBI seizes arms from house in Sandeshkhali (PC - X/ANI)

West Bengal: राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (NSG) चे बॉम्ब निकामी करणारे पथक संदेशखळी (Sandeshkhali) च्या अग्रहाटी गावात पोहोचले. संदेशखळी प्रकरणासंदर्भात आज सकाळपासून सीबीआय पश्चिम बंगालमध्ये अनेक छापे टाकत आहे. एजन्सीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीबीआयने शस्त्रेही जप्त केली आहेत. शुक्रवारी पुन्हा सीबीआयने संदेशखळीवर छापा टाकला. शहाजहान शेखचा जवळचा नातेवाईक अबू तालेब मोल्ला याच्या घरी मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि बॉम्ब ठेवण्यात आल्याची माहिती तपास यंत्रणेला मिळाली होती. माहिती मिळताच शोध मोहीम सुरू करण्यात आली. यावेळी सीबीआयला मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा सापडला. यानंतर एनएसजी (नॅशनल सिक्युरिटी गार्ड) ला पाचारण केले.

पहा ANI वृत्तसंस्थेचा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now