EAM Jaishankar Blasts Canada: दहशतवादी आणि उघडपणे हिंसेचे समर्थन करणार्‍या लोकांबद्दल कॅनडाची समर्थन करणारी वृत्ती; परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची खंत

त्यांना सार्वजनिकरित्या घाबरवले जाते. यामुळे मला कॅनडामधील व्हिसा ऑपरेशन्स तात्पुरते स्थगित करण्यास भाग पाडले आहे.

S Jaishankar (PC - ANI)

EAM Jaishankar Blasts Canada: परराष्ट्र मंत्री एस जयशंकर (EAM Jaishankar) यांनी खलिस्तानी अतिरेक्यांच्या मुद्द्यावरून भारत-कॅनडा वादावर पुन्हा वक्तव्य केलं आहे. दहशतवादी आणि उघडपणे हिंसेचे समर्थन करणार्‍या लोकांबद्दल कॅनडाची परवानगी देणारी वृत्ती असल्याचं जयशंकर यांनी म्हटलं आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी केलेले आरोप निराधार असल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. त्यांनी सांगितले की, त्यांनी अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) जेक सुलिव्हन आणि परराष्ट्र सचिव अँटनी ब्लिंकन यांच्याशी भारत-कॅनडा राजनैतिक वादावर चर्चा केली. जयशंकर यांनी गुरुवारी अँटोनी ब्लिंकन आणि जेक सुलिव्हन यांची भेट घेतली. यावेळी परराष्ट्र मंत्री म्हणाले, आज मी प्रत्यक्षात अशा परिस्थितीत आहे की, माझे राजनयिक कॅनडामधील दूतावास किंवा वाणिज्य दूतावासात जाण्यासाठी असुरक्षित आहेत. त्यांना सार्वजनिकरित्या घाबरवले जाते. यामुळे मला कॅनडामधील व्हिसा ऑपरेशन्स तात्पुरते स्थगित करण्यास भाग पाडले आहे.