Bihar Shocker: दुर्गा पूजा पंडालमध्ये चेंगराचेंगरीत 5 वर्षाच्या मुलासह दोघांचा मृत्यू; गोपालगंजमधील घटना

बिहारच्या गोपालगंज जिल्ह्यातील दुर्गा पूजा पंडालमध्ये चेंगराचेंगरी झाल्याची घटना समोर आली आहे.

Bihar:

Bihar Shocker: बिहारच्या गोपालगंज जिल्ह्यातील दुर्गा पूजा पंडालमध्ये चेंगराचेंगरी झाल्याची घटना समोर आली आहे.या दुर्घटनेत  एक पाच वर्षांचा मुलगा आणि दोन महिलांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. राजा दल परिसरातील गर्दीच्या पंडालमध्ये ही घटना सोमवारी घडली. भाविक प्रसाद घेण्यासाठी रांगेत उभे असताना मुल चेंगराचेंगरीत खाली पडला आणि दोन वृध्द महिला मुलाला वाचवण्यसाठी खाली वाकल्या तेव्हा त्यांना देखील चिरडण्यात आले. दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement