Video: शिवपुरी जिल्ह्यात ASI अधिकाऱ्याला बेदम मारहाण, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

मध्य प्रदेशातील शिवपूरी जिल्ह्यात कारवाई करण्यासाठी आलेल्या कृषी विभागाच्या पथकावर हल्ला करण्यात आला. पुरणखेडी टोल प्लाझाजवळ ही घटना घडली. या हल्ल्यात अधिकारी आणि कर्मचारी जखमी झाले आहे.

Madhya Pradesh Fighting video pc X

Video: मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) शिवपूरी जिल्ह्यात कारवाई करण्यासाठी आलेल्या कृषी विभागाच्या पथकावर हल्ला करण्यात आला. पुरणखेडी टोल प्लाझाजवळ ही घटना घडली. या हल्ल्यात अधिकारी आणि कर्मचारी जखमी झाले आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, काही कर्मचारी जीव वाचवण्यासाठी पळत आहे. याचदरम्यान एका एएसआयला लाथा बुक्क्यांनी मारहाण करून जमिनीवर फेकले आहे. त्यामुळे ते गंभीर जखमी झाले. मिळालेल्या माहितीनसुार, करचुकवेगिरीच्या तक्रारीवरून ग्वाल्हेर चंबळ विभागाच्या पथकाने कोलारस येथील पुरनखेडी टोल प्लाझाजवळ शेंगदाण्यांनी भरलेला ट्रक पकडला असता, चालकाला याबाबत कोणतेही कागदपत्र दाखवता आले नाही. या वेळी कारवाई सुरू असताना, काही लोक एक थार जीपमधून आले आणि त्यांनी वादविवाद सुरू केले. वादविवादानंतर एएसआयला काही जणांनी बेदम मारहाण केली. ही घटना जवळच असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (हेही वाचा- कारची पादचाऱ्याला धडक, दोन गटात तुफान हाणामारी, सहा जणांस अटक (Watch Video)

घटनेचा व्हिडिओ व्हायरल

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now