Bengaluru Rameshwaram Cafe Blast: रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणातील संशयित व्यक्तीचे आणखी एक CCTV फुटेल आले समोर, पहा व्हिडिओ

दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये, तो बंगलोर मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (BMTC) बसमध्ये चढताना दिसत आहे.

Rameshwaram Cafe Blast suspect Video (PC - X/ANI)

Bengaluru Rameshwaram Cafe Blast: राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) शुक्रवारी बेंगळुरूच्या रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट (Rameshwaram Cafe Blast) प्रकरणाशी संबंधित संशयिताचा आणखी एक व्हिडिओ जारी केला आहे. एजन्सीने त्याची ओळख पडताळून पाहण्यासाठी लोकांची मदत मागितली आहे. एका नवीन फुटेजमध्ये संशयित टी-शर्ट, फेस मास्क घातलेला आणि बॅग घेऊन जाताना दिसत आहे. दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये, तो बंगलोर मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (BMTC) बसमध्ये चढताना दिसत आहे. एनआयएने संबंधित संशयित व्यक्तीची माहिती देण्यासाठी नागरिकांना खालील क्रमांकावर कॉल करण्याची विनंती केली आहे. 08029510900, 8904241100 किंवा info.blr.nia@gov.in वर ईमेल करण्याची विनंती केली आहे. (वाचा - Bengaluru Cafe Blast: रामेश्वरम कॅफे स्फोटातील संशयित हल्लेखोराचे पहिले छायाचित्र आले समोर; बेंगळुरूमध्ये BMTC व्होल्वो बसमधून प्रवास करताना कॅमेऱ्यात कैद)

पहा व्हिडिओ -