Indian Coast Guard Chopper Crash: गुजरातमधील पोरबंदर येथे मोठा अपघात; प्रशिक्षणादरम्यान तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर कोसळले, तीन ठार (Watch Video)

भारतीय तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर एएलएच ध्रुव प्रशिक्षणादरम्यान रविवारी गुजरातच्या पोरबंदरमध्ये क्रॅश झाले. या दुर्घटनेवेळी हेलिकॉप्टरमध्ये दोन वैमानिक आणि एका हवाई दलातील सदस्यासह तीन कर्मचारी हेलिकॉप्टरमध्ये होते. यात तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

Photo Credits: X/@SmritiSharma

Indian Coast Guard Chopper Crash: गुजरातमधील पोरबंदर येथे मोठा अपघात झाला आहे. प्रशिक्षणादरम्यान तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर एएलएच ध्रुव (ALH Dhruv) कोसळले. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. दुर्घटनेनंतर लगेच अग्निशमन दलाचे वाहन आणि वैद्यकीय पथक तेथे दाखल झाले होते. भारतीय तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोस्ट गार्डचे एएलएच ध्रुव हेलिकॉप्टर नियमित प्रशिक्षण उड्डाण दरम्यान क्रॅश ( Indian Coast Guard Chopper Crash) झाले. हेलिकॉप्टर जमिनीवर आदळताच आग भडकली आणि तीघांचा जीव गेला. (हेही वाचा: Army Vehicle Falls Into Gorge In J&K's Bandipora: जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरामध्ये लष्कराचे वाहन दरीत कोसळले; 2 जवानांचा मृत्यू, 3 गंभीर जखमी)

भारतीय तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरचा अपघात

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now