Air India Express Flight Video: एअर इंडिया एक्सप्रेस विमानाच्या इंजिनला आग, बेंगळुरू विमानतळावर आपत्कालीन लँडिंग (Watch Video)

बेंगळुरूहून कोचीला जाणाऱ्या एअर इंडिया एक्स्प्रेसच्या फ्लाइटमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. विमान उड्डाणानंतर काही वेळातच विमानाच्या उजव्या इंजिनला आग लागली.

Air India Express fligh PC TWITTER

 Air India Express Flight Video: बेंगळुरूहून कोचीला जाणाऱ्या एअर इंडिया एक्स्प्रेसच्या फ्लाइटमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. विमान उड्डाणानंतर काही वेळातच विमानाच्या उजव्या इंजिनला आग लागली. या घटनेनंतर प्रवाशांमध्ये खळबळ उडाली. आग लागताच पायलटने तातडीने बेंगळुरु विमानतळावर इमर्जन्सी लॅंडिग केले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये विमानाच्या इंजिनमधून आग आणि धूर निघताना दिसत आहे. या घटनेनंतर प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते. मात्र, वेळीच सावध राहून इमर्जन्सी लॅंडिग केले आणि सर्व प्रवाशी सुखरुप उतरले. (हेही वाचा- रामपूर जिल्हा रुग्णालयाच्या जुन्या इमारतीला आग, कोणतीही जीवितहानी नाही)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement