AAP MLA Abused Farmers: आप आमदार रणबीर सिंह यांचे शेतकऱ्यांशी भांडण; शिवीगाळ करताना दिसले नेते, व्हिडिओ व्हायरल

रणबीर सिंग यांनी एका सार्वजनिक रॅलीत भाग घेतला होता, जेथे ते त्यांचे काही समर्थक आणि शेतकऱ्यांसह फिरताना दिसले. हिरवे झेंडे घेऊन शेतकऱ्यांनी मोर्चा काढत नेत्याला घेराव घातला. यावेळी किसान मोर्चातील एका ज्येष्ठ सदस्यासोबत रणवीर सिंग यांचा वाद सुरु झाला.

AAP (Photo Credit: File Photo)

AAP MLA Abused Farmers: आम आदमी पक्ष (AAP) नव्या वादात सापडला आहे. आपचे फिरोजपूरचे आमदार रणबीर सिंग हे शिवीगाळ करताना कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. व्हिडिओमध्ये रणबीर सिंग शेतकऱ्यांशी गैरवर्तन करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर वादाला तोंड फुटले आहे. रणबीर सिंग यांनी एका सार्वजनिक रॅलीत भाग घेतला होता, जेथे ते त्यांचे काही समर्थक आणि शेतकऱ्यांसह फिरताना दिसले. हिरवे झेंडे घेऊन शेतकऱ्यांनी मोर्चा काढत नेत्याला घेराव घातला. यावेळी किसान मोर्चातील एका ज्येष्ठ सदस्यासोबत रणवीर सिंग यांचा वाद सुरु झाला. पुढे सिंग यांचा स्वतःवरील ताबा सुटला आणि त्यांनी शेतकऱ्याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. केंद्र सरकारकडून अधिक एमएसपीच्या मागणीसाठी आम आदमी पक्षाने नुकत्याच झालेल्या आंदोलनात शेतकऱ्यांना धार्मिक पाठिंबा दिला आहे. अशा परिस्थितीत आमदार रणबीर सिंह यांचा हा व्हिडिओ पक्षासाठी नवे आव्हान निर्माण करू शकतो. (हेही वाचा: Farmers Protest: संयुक्त किसान मोर्चा तीव्र आंदोलनाच्या पवित्र्यात, 14 मार्च रोजी रामलीला मैदानावर ट्रॅक्टर रॅली)

पहा व्हिडिओ-

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now