Viral Video: क्रुरतेचा कळस! भटक्या कुत्र्याला बाईकने बांधून रस्त्यावर फरफटत नेलं, भयावह Video आला समोर, गुन्हा दाखल
उत्तर प्रदेशातील आग्रा येथील एका अमानुषपणे कुत्र्याला दोरीने बांधून बाईकवरून खेचून घेऊन जात असल्याचे एका व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Viral Video: उत्तर प्रदेशातील आग्रा येथील एका अमानुषपणे कुत्र्याला दोरीने बांधून बाईकवरून खेचून घेऊन जात असल्याचे एका व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, कुत्र्याचे पाय दोरीने बांधले आहेत आणि त्याला बाईकवरून फरफटत नेले आहे. हे भयावह कृत्य पाहून अनेक नेटकऱ्यांनी कंमेट सुध्दा केले आहेत. कुत्रा वेदनांनी ओरडत आहे. ही क्रुरता पाहून अनेक युजर्सींनी संताप व्यक्त केला. निष्पाप कुत्र्याला क्रुरतेची वागणुक दिल्याने आरोपींवर कारवाई करण्याची मागणी दिली आहे. सिकंदरा पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे.त्यांनी तातडीने या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. या कृत्यामध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींची ओळख पटली असून त्यांना पकडण्याचा प्रयत्न सुरु आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)