Assam Video: पोलिसांसमोर अल्पवयीन मुलाला बेदम मारहाण, व्हिडिओ समोर आल्यानंतर आरोपीला अटक
आसामच्या सोनितपूर जिल्ह्यात एका दुकानदाराने अल्पवयीन मुलाला चोर असल्याच्या संशयाने बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे.
Assam Video: आसामच्या सोनितपूर जिल्ह्यात एका दुकानदाराने अल्पवयीन मुलाला चोर असल्याच्या संशयाने बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. मुलाला पोलिसासमोर मारहाण केलेच्या व्हिडिओत दिसत आहे. ही घटना शुक्रवारी घडली तर या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतर दुकानदाराविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दादुल सरमा असे आरोपीचे नाव असून तो सोनितपूर जिल्ह्यातील ढेकियाजुली भागातील रहिवासी आहे. अल्पवयीन पीडिता त्याच्याकडे कामाला होता,मुलाने फोन चोरला परंतु फोन त्याच्या सापडला नाही असं नागरिकांनी सांगितले. आरोपीवर भारतीय दंड संहितेच्या कलम ३०७ च्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ढेकियाजुली मार्केट परिसरात सरमाने अल्पवयीन मुलाला खांबाला बांधून मारहाण केल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Police Constable Rapes Married Woman: नाशिकमध्ये पोलीस कॉन्स्टेबलचा विवाहित महिलेवर बलात्कार; पीडितेला जीवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक
Advertisement
Advertisement