Delhi Fire: दिल्लीत मोठी दुर्घटना, न्यू बॉर्न बेबी केअर रुग्णालयाला आग लागल्याने सहा शिशूंचा मृत्यू

दिल्लीच्या विवेक विहार भागातील रुग्णालयाला आग लागल्याची घटना घडली. या दुर्घटनेत सहा नवजात शिशूंचा होरपळून मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले.

delhi fire ANI

Delhi Fire: दिल्लीच्या विवेक विहार भागातील रुग्णालयाला आग (Fire) लागल्याची घटना घडली. या दुर्घटनेत सहा नवजात शिशूंचा होरपळून मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. ही आग नवजात शिशु देखभाल ( न्यू बॉर्न बेबी केअर) रुग्णालयाला लागली. आगीची माहिती अग्निशमन विभागाला देण्यात आली. घटनास्थळी बचाव कार्य सुरु केले. आगीतून 11 जणांना वाचवण्यात आले. अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. जवनांनी घटनास्थळावरून अनेक जखमींना बाहेर काढले. त्यांना दुसऱ्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.ही आग शनिवारच्या रात्री लागली होती. आग कश्याने लागली हे अद्याप समोर आले नाही. (हेही वाचा- राजकोटच्या TRP Mall च्या गेमिंग झोनमध्ये भीषण आग; 20 हून अधिक लोकांच्या मृत्यूची शक्यता)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now