7th Pay Commission Latest News: महागाई भत्ता 4 टक्क्यांनी वाढला? PIB ने सांगितले व्हायरल फोटोमागील सत्य
डीए वाढीची आतुरतेने वाट पाहणाऱ्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांनी अधिकृत पुष्टीकरणाची प्रतीक्षा करावी आणि अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहनही पीआयबीकडून करण्यात आलं आहे.
7th Pay Commission Latest News: महागाई भत्त्याचा अतिरिक्त हप्ता 01.07.2022 पासून लागू होईल असा दावा करणारी बातमी WhatsApp आणि सोशल मीडियावर प्रसारित केली जात आहे. मात्र, ही बातमी खोटी आहे. पीआयबी फॅक्ट चेक टीमने केलेल्या फेक चेकनुसार, वित्त मंत्रालयाने यासंदर्भात कोणतेही पत्रक जारी केलेले नाही. विभागाने असा कोणताही आदेश जारी केलेला नाही, असे पीआयबीने ट्विटमध्ये म्हटले आहे. डीए वाढीची आतुरतेने वाट पाहणाऱ्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांनी अधिकृत पुष्टीकरणाची प्रतीक्षा करावी आणि अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहनही पीआयबीकडून करण्यात आलं आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)